लहान वाघोदा-थोरगव्हाण शेतरस्त्यांची अभियंत्यांनी केली पाहणी


सावदा : सावदा येथून जवळच असलेल्या लहान वाघोदा ते थोरगव्हाण हा शेतरस्ता व्हावा म्हणून या भागातील शेतकरी अनेक दिवसांपासून आग्रही होते. या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारही करण्यात आल्याने आमदारांनी रस्ता कामाबाबत सार्वजनिक बांधकाम ख्यात्याचे अधिकारी यांना पाहणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार 9 रोजी सार्वजनिक बांधकाम ख्यात्याचे सावदा येथील ज्यु.अभियंता निकम, सावदा येथील शिवसेना शहर प्रमुख सूरज परदेशी व सहकारी तसेच गोपाळ भंगाळे, खाचणे, लिलाधर पाटील, दामा चौधरी, पुष्पा खाचणे, पाटील, राजू माळी, प्रशांत फालक, धोण्डु कोळी, पीतांबर कुंभार शेतकर्‍यांनी सदर शेतरस्त्याची पाहणी केली.

प्रस्तावानंतर लवकरच होणार रस्त्याचे काम
लवकरच या शेत रस्ता कामाबाबत प्रस्ताव पाठवून तो मंजूर होईल व या कामास सुरवात होईल, असे शहरप्रमुख सुरज परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, हा शेतरस्ता तयार झाल्यास या भागातील शेतकर्‍यांची शेतात जाण्या-येण्याची चांगली सोय होईल व शेत माल काढण्यासाठी शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे, त्यामुळे हे शेतकरी हिताचे काम आपण प्राधान्याने करू असे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !