मजूर नेणारे ट्रॅक्टर उलटून तीन महिला जखमी
सावदा : सावदा येथून सुमारे 13 किलामीटर अंतरावरील लोहारा येथे शेत मजूर महिलांना घेऊन जाणार्या ट्रॅक्टरची ट्रॉली नदीपात्राजवळ पलटी होऊन झालेल्या अपघातात तीन मजूर महिला जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. शेतातील मजूर महिलांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर लोहारा गावाजवळील सुकी नदीच्या घाटात चढत असताना अचानक ब्रेक फेल झाले व ट्राली नदीपात्राजवळ चढावाजवळ उलटली. या अपघातात तीन महिला जखमी झाल्या असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघातस्थळी सहा.निरीक्षक देविदास इंगोले व कर्मचारी यांनी धाव घेतली.

