प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असल्यास अडचणी होतील दूर


अ‍ॅड.व्ही.बी.तायडे : भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात कायदा साक्षरता कार्यशाळेचा समारोप

भुसावळ : कायद्याने ठरवून दिलेले नियम प्रत्येक नागरीकाने पाळले पाहिजे तसेच कायदा माहित असेल तर गैरकृत्य होत नाही व ज्या व्यक्तीला कायद्याचे ज्ञान अवगत आहे त्यांना अडचणी येत नाहीत, असे मत भारत सरकारचे नोटरी अ‍ॅड.व्ही.बी.तायडे यांनी येथे व्यक्त केले. दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, भुसावळ व कवयत्रिी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत ‘विस्तार कार्यक्रम’ कार्यशाळेच्या तिसर्‍या दिवशीच्या समारोप सत्रात रविवारी सकाळी ते बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर व्यवस्थापन परीषद सदस्य दीपक बंडू पाटील, प्रमुख वक्ते अ‍ॅड.व्ही बी तायडे, प्राचार्य डॉ.आर.पी.फालक उपस्थित होते.


कायद्याच्या ज्ञानाने अडचणी होतात दूर
अ‍ॅड.व्ही.बी.तायडे म्हणाले की, कायदे जनहितासाठी असतात त्यामुळे जागृती होते हक्क मिळविता येतात, मूलभूत अधिकार मिळवून देतात, कायद्याच्या फायदे व तोटे दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. शासनाने वेळोवेळी कायद्यामध्ये बदल करून महिला सक्षमीकरण, बाल गुन्हेगारी, ज्येष्ठ नागरीक कायदा, मोटार अपघात कायदा, ग्राहक, निर्भया, लोक अदालत अपंग हक्क कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, शिक्षण , पालक मेन्टेन्स कायद्यात नवीन काय बदल केला आहे याची माहिती दिली.

ज्ञानाचा दिवा पुन्हा पेटणार
दीपक पाटील म्हणाले की, अशा कार्यशाळेच्या माध्यमातून ज्ञानाचा दिवा पुन्हा पेटून महामारीचा अंधकार नाहीसा होईल. कोरोनाचा परीपाक म्हणजे ऑनलाईन व्याख्यान होय. मिशन बिगीन अगेन अंतर्गत कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.

कायदा नसेल तर जंगल राज व्यवस्था
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग कार्यक्रमातून विद्यपीठाचे ज्ञानदान करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोविड 19 महामारीत ऑनलाईन सत्र घेण्यात आले. कायदा नसेल तर जंगल राज व्यवस्था सुरू होईल. सामान्य माणसाचे जीवन जगणे कठीण होईल. ज्ञान व विकासाची व्याप्ती वाढत असून समाज बदलत आहे सर्वांना समृद्ध, सुखी, शोषणमुक्त वातावरण, शांत जीवन जगायचे असेल तर कायद्याचे ज्ञान आवश्यक आहे.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ संजय बाविस्कर यांनी तर सूत्रसंचालन प्राफअंजली पाटील यांनी केले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागाचे चेअरमन प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, सदस्य प्रा.डॉ.शोभा चौधरी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, समन्वयक, क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी, सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केल्याचे प्रसिध्दी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !