रावेरात डेमो हाऊससाठी झाले लाईन आऊटचे काम


रावेर : तालुक्यातील घरकुल लाभार्थींना घरकुल कसे बांधायाचे याचा डेमो पाहता यावा म्हणून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डेमो-हाऊस बांधकाम करण्यात येणार आहे. याची लाईन-आऊट सोमवारी टाकण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, जि.प.उपविभागीय बांधकाम अधिकारी चंद्रशेखर चोपडेकर उपस्थित होते.

घरकुलासंदर्भात प्रत्यक्षात डेमो
प्रत्येकाला गरीब कुटुंबाला घरकुल मिळावे म्हणून शासन वेगवेगळ्या योजनेद्वारे त्यांना घरकुलांचा लाभ मिळवुन देते परंतु घरकुल बांधायचे कसे ? असा प्रश्न घरकुल लाभार्थींसमोर उपस्थित होतो. आता याचीदेखील व्यवस्था पंचायत समिती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. लवकरच पंचायत समितीच्या आवारात ग्रामीण भागाच्या जनतेला बघता यावे यासाठी डेमो हाऊस तयार करण्यात येत आहे. यासाठी सोमवारी लाईन-आऊट टाकण्यात आली आहे.


अस असेल डेमो-हाऊस
रावेर पंचायत समितीच्या आवारात तयार होणार्‍या डेमो हाऊस एक लाख 90 हजार रुपये खर्च करून तयार करण्यात येणार आहे. 270 चौरस मीटर जागेत तयार डेमो-हाऊसमध्ये 9 बाय 10 चा हॉल 7 बाय 9 चे किचन एक टॉयलेट-बाथरुम, स्टाईल दरवाजे, खिडकी लावून तालुक्यातील घरकुल लाभार्थींना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे.

डेमो-हाऊस लाभाथींनी पहावे : कोतवाल
येथे तयार करण्यात येणारे डेमो हाऊस पूर्ण झाल्यानंतर त्याच्या आवारात पारस बाग लावण्यात येतील तसेच पावसाचे पाणी संकलीत करण्यात येणार आहे. शौचखड्डादेखील तयार करण्यात येणार आहे. तालुक्यातील घरकुल लाभार्थींनी येथे तयार होणारे डेमो-हाऊस नक्की नक्की पहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !