दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी जीवे ठार मारण्याची धमकी
यावल : तालुक्यातील पिंप्री येथील रहिवासी प्रकाश दोधु कोळी यांची आदिवासी योजनेतून अनुदानीत शेती कामी ट्रॅक्टर, रोटर, पेरणी, यंत्र, ट्रिलर असे शेती उपयोगी साहित्य मिळवुन देतो असे सांगत तुकाराम सुभाष सपकाळे, सलिम सिंकदर तडवी व शब्बीर नामदार तडवी (रा.परसाडे) या तिघांनी फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल होता. 8 जानेवारी रोजी प्रकाश कोळी हे दुचाकी (एम.एच.19 डी. जी.2986) व्दारे भुसावळकडून यावल येत होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करीत शब्बीर नामदार तडवी (रा.परसाडे) याने वाघळुद फाट्याजवळ त्यांना थांबवले व रस्ता अडवून माझ्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घे नाहीतर, मी तुला जीवे ठार मारेल असे सांगत शिवीगाळ केली. कोळी यांनी सोमवारी याबाबत यावल पोलिसात शब्बीर तडवीविरूध्द तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अशोक जवरे करीत आहेत.

