भुसावळ तालुक्यातील अवैध धंदे बंद करा : पोलिस उपअधीक्षकांना साकडे


भुसावळ : भुसावळ शहर व तालुक्यात अवैधरीत्या सुरू असलेले धंदे बंद करावेत, भुसावळ शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा तसेच भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात शेतकरी व व्यापारी यांच्या सुरक्षतेच्या हेतूने व कुठलाही गैर प्रकार न घडण्यासाठी नवीन पोलिस चौकी कार्यान्वीत करण्यात यावी, अशी मागणी कृउबा सभापती सचिन चौधरी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे तसेच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे केली आहे. तत्काळ दोन दिवसात योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन उपअधीक्षकांनी दिल्याचे चौधरी कळवतात.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !