ऐनपूरला कोरोना रुग्ण आढळताच गटविकास अधिकार्यांसह ग्रामसेवकांना सूचना
रावेर : तालुक्यातील ऐनपूर ग्रामपंचायतीचे दोन उमेदवार कोरोना पॉझीटीव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी तालुक्यात सर्व ग्रामसेवकांना सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. ऐनपूरमधील कोरोनाबाधीत उमेदवारांच्या घराजवळ कन्टेमेंट झोन तयार करण्यात आला असून दोघे उमेदवार सध्या विलगीकरण कक्षात आहे.त्यांच्या संपर्कात कोण-कोण मतदार आले? याचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना कोरोना संदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये गर्दी करू नका, गावात प्रत्येकांनी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून खबरदारी घेण्याच्या सक्तीच्या सूचना गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना दिल्या आहेत.

