वरणगावातील 24 तास पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्याचा आनंद
माजी जलसंदा मंत्री गिरीश महाजन यांची वरणगावात सत्कारप्रसंगी ग्वाही
वरणगाव : वरणगाव शहरात 25 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्याचा मनस्वी आनंद असून वरणगावकरांना 24 तास पाणीपुरवठा करणे भाजपाचे ध्येय असून वरणगाव शहरात भाजपा सरकारच्या माध्यमातून 70 कोटींच्या विकास कामातून शहराचा संपूर्ण चेहरा-मोहरा बदलला असून जळगाव जिल्ह्यात वरणगाव पहिलेच गाव असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सत्काराला उत्तर देताना येथे व्यक्त केले. वरणगाव शहरासाठी मंजूर असलेल्या पाणी योजनेवर दीड वर्षापासून स्थगिती बसवण्यात आली होती. ती माजी मंत्री गिरी महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षाताई खडसे यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करून उठवल्याने लोकप्रतिनिधींचा गुरुवारी सत्कार करण्यात आला.
शिवतीर्थ मैदानावर नागरी सत्कार
पाणीपुरवठा योजनेवरील उठवलेली स्थगिती तसेच वरणगाव शहरात नगरपरीषदेच्या माध्यमातून 65 लाखांचे महात्मा जोतिबा फुले सामाजिक सभागृह व वरणगाव शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी केलेला अनमोल पाठपुरावा व वरणगावकरांना सर्व सुख-सोयी उपलब्ध करून दिल्याने गुरुवारी सकाळी शिवतीर्थ मैदानावर लोकप्रतिनधींचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी माळी समाजाच्या वतीने माजी मंत्री गिरीश महाजन यांचा नागरी सत्कार करण्यात आला. माळी समाजाकडे उपलब्ध असलेल्या मंगल कार्यालयाच्या माध्यमातून कार्यभार सुरू करावा, अशी सूचना यावेळी माजी महाजन यांनी केली सुरवातीला. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वांरूढ पुतळ्याचे विधीवत पूजन लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी माजी मंत्री व आमदार संजय सवकारे , खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे, माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा अध्यक्ष सुनील माळी, माळी समाज अध्यक्ष संजय माळी, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, हाजी अल्लाउद्दीन सेठ, कामगार नेते मिलिंद मेढे, ईरफान पिंजारी, गोलू राणे, अॅड.ए.जी.जंजाळे, संजयकुमार जैन, शामराव धनगर, ज्ञानेश्वर घाटोळे, कुंदन माळी, डी.के.खाटीक, संदीप आकाश निमकर, संदीप माळी, कृष्णा माळी, माजी सरपंच सुभाष धनगर, डॉ.प्रवीण चंदने, पप्पू ठाकरे, शोएब खान नटराज चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्तेे उपस्थित होते.


