भुसावळात सायक्लोथॉन टी शर्टचे थाटात अनावरण
भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे रविवार, 17 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सायक्लोथॉन रॅलीच्या टी शर्ट अनावरण सोहळा येथील आय.एम.ए.हॉलमध्ये थाटामाटात पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय सावकारे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, सायक्लोथॉन प्रमुख प्रायोजक रोनक रुपेश जैन, जळगाव मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास घोलप, जळगाव जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्रा.प्रवीण फालक व डॉ.सुजाता केळकर हे उपस्थित होते.
अशा उपक्रमांची गरज : आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, भुसावळचे सांस्कृतिक आणि क्रीडा वैभव जतन करून वृद्धिंगत करण्यात अग्रेसर असलेल्या रोटरी रेल सिटीचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. आगामी काळात असेच उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शनिवार, 16 रोजी होणारा सायक्लोथॉन एक्स्पो आणि रविवारी होणारी रॅली यास भुसावळकरांनी जोमाने प्रतिसाद द्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. नगरपालिका प्रशासनाने या रॅलीत सहभागी सायकलस्वारांना ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत एक कॅप देण्याचे जाहीर केले. रोटरी रेल सिटीचे श्रीकांत जोशी यांनी सूत्रसंचालन तर अध्यक्ष संदीप जोशी यांनी आभार मानले. याप्रसंगी रेल सिटी सदस्य, जळगाव सायकलिंग ग्रुप आणि भुसावळ सायकलिंग व रनिंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यशस्वितेसाठी प्रोजेक्ट चेअरमन सन्मीत पोतदार, डॉ मकरंद चांदवडकर व सर्व रेल सिटी सदस्यांनी परीश्रम घेतले.



