मुख्याध्यापिका बेबी जयकारे पुरस्काराने होणार सन्मानीत


वरणगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जळगाव, जिल्हा महिला शिक्षक संघटना, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या शिक्षकांना सन्मानीत केले जाते. जिल्हा परीषद शाळा, गारखेडा, ता.जामनेर येथील ग्रेडेड मुख्याध्यापिका बेबी जयकारे यांनी 38 वर्षांच्या काळात विविध शाळेत विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन प्रयोगाची अंमलबजावणी केली. यामुळे 2021 या वर्षातील गुणवंत व आदर्श शिक्षिका म्हणुन त्यांची निवड करण्यात आली असून लवकरच त्यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !