गावठी कट्टा प्रकरणातील पसार आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : गेल्या सहा महिन्यांपासून गावठी कट्टा प्रकरणातील पसार असलेल्या आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी रविवारी सायंकाळी मुसक्या आवळल्या. भुसावळ शहरातील डेली आठवडे बाजार येथील डिस्को टॉवरजवळ ही कारावई करण्यात आली. जितेंद्र बबलु पथरोड (वय 24, रा.वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) हा सहा महिन्यांपासून पसार होता. मुख्य आरोपी अरबाज आरीफ पटेल (वय 22, रा.पटेल कॉलनी, जाममोहल्ला, भुसावळ) यास अटक करुन त्याच्याजवळून 20 हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता मात्र सहआरोपी पटेल जितेंद्र बबलु पथरोड (वय 24, रा.वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) हा सहा महिन्यांपासून पसार होता. अखेर पो.नि. दिलीप भागवत यांना गोपनीय मिळाल्यावरुन जितेंद्र पथरोड याला भुसावळ शहरातील डेली आठवडे बाजार येथील डिस्को टॉवरजवळ ताब्यात घेतले आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळचे पो.उप विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.चे सपोनि कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोटला, स.फौ. तस्लीम पठाण, पो.हे.कॉ.जितु पाटील, जयेंद्र पगारे, पो.ना अनिल पाटील, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, पो.कॉ.कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, सचिन चौधरी, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, रवींद्र तायडे, योगेश माळी, प्रशांत सोनार आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !