यावल येथे उद्या कृषी महोत्सवाचे आयोजन


यावल : येथे श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक अंतर्गत कृषीशास्त्र विभागाद्वारे आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2021 सप्ताहाचे आयोजन केले आहे. यावल येथील बसस्टॅन्डजवळ फैजपूर रोडवरील प्रशांत अ‍ॅग्रो, पी.टी. चोपडे यांच्या शेतात मंगळवार, 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  कार्यक्रमात जगभरातील सुमारे 11 ठिकाणी एकदिवसीय कृषीचा जागर होणार आहे. शेतकर्‍यांच्या सर्वांगीण विकासासाठी बांधावर घेण्यात येणारा विशेष उपक्रम 10ते 15 गावातील शेतकर्‍यांसाठी घेण्यात येणारा कार्यक्रम 22 जानेवारी ते 28 जानेवारी या सात दिवसात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तालुक्यात विविध ठिकाणी होणारा एकदिवसीय कृषीचा जागर, शेतकरी व शेतीपुरक कंपन्यांना जोडणारे प्रभावशाली माध्यम आहे. मेळाव्यात शेतीस पुरक जोड व्यवसाय व प्रक्रिया उद्योगांची माहिती, मार्गदर्शन तसेच देशी व गावराण बियाण्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकर्‍यांसाठी कृषी अभ्यासपर शिवार फेरीचे आयोजन त्याचबरोबर प्रयोगशिल शेतकर्‍यांसाठी कृषी माऊली सत्कार, शेतकर्‍यांच्या कुंटुंबातील इच्छुक उपवर वधुंसाठी स्थळांची माहिती आणि शेतकर्‍यांसाठी केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहितीसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !