दीपनगरातून 17 वर्षीय युवतीचे अपहरण


भुसावळ : तालुक्यातील दीपनगर येथे 17 वर्षीय युवतीचे अपहरण झाल्याची घटना शनिवार, 23 रोजी दुपारी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घरासमोर राहत असलेल्या काकांकडे ही युवती पापड करायला गेली होती. त्याचवेळी पाच मिनिटांत परत येते असे सांगून ती काकांच्या घरून गेली होती. त्यानंतर युवती बेपत्ता झाली. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक निरीक्षक रूपाली चव्हाण यांनी या घटनेची माहिती घेतली. या गुन्ह्याच्या तपासात पोलिस परीसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !