भुसावळ माजी नगरसेवक पूत्र हल्ला प्रकरण : आरोपीविरुद्ध गुन्हा
अल्पवयीन आरोपी ताब्यात : उमेश इंगळे यांच्यावर जळगावात उपचार
भुसावळ- शहरात श्री विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरू असताना माजी नगरसेवक शांताराम इंगळे यांचे पुत्र व शिवमुद्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश शांताराम इंगळे यांच्यावर 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीने जामनेर रस्त्यावरील मनीष ट्रॅव्हल्ससमोर चाकूने हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री 9.15 ते 9.45 वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी शुक्रवारी पहाटे 6.15 वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलिस ठाण्यात माजी नगरसेवक शांताराम आनंदा इंगळे (देना नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी गौरव नालेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर अल्पवयीन आरोपीसदेखील ताब्यात घेण्यात आले. त्यास शनिवारी बाल न्याय मंडळापुढे हजर केले जाणार आहे.
भुसावळात माजी नगरसेवक पूत्रावर हल्ला-