मुंबईतील पावसामुळे उद्या तीन एक्स्प्रेस रद्द


प्रवाशांचे सलग दुसर्‍या दिवशी हाल ः मंगळवारी 15 गाड्या झाल्या रद्द

भुसावळ- मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे बुधवारी तीन रेल्वे गाड्या रद्दचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी अप-डाऊन मार्गावरील 15 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

मंगळवारी 15 रेल्वे गाड्या रद्द
मंगळवारी भुसावळ विभागातून धावणार्‍या अप-डाऊन मार्गावरील तब्बल 15 गाड्या प्रारंभिक स्थानकावरून रद्द करण्यात आल्या. रद्द गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 11058 अमृतसर-मुंबई एक्सप्रेस, अप 12168 वाराणसी-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस, अप 11060 छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस, अप 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस, अप 12568 रक्सोल लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस, 22865 अप भुवनेश्वर लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस तसेच डाऊन मार्गावरील डाऊन 22855 लोकमान्य टिळक टर्मिनल्स टाटा नगर अंत्योदय एक्स्प्रेस, डाऊन 12362 मुंबई-आसनसोल एक्स्प्रेस, डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनल्स भुवनेश्वर एक्सप्रेस, डाऊन 22866 लोकमान्य टिळक टर्मिनल्स भुवनेश्‍वर एक्स्प्रेस, डाऊन 12534 मुंबई-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस, डाऊन 12137 मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल, डाऊन 82356 मुंबई-पटना सुविधा एक्स्प्रेस, डाऊन 13202 लोकमान्य टिळक टर्मिनल्स राजेंद्र नगर पटना जनता एक्स्प्रेस, डाऊन 12322 मुंबई-हावडा व्हाया अलाहाबाद एक्स्प्रेस, डाऊन 12101 लोकमान्य टिळक टर्मिनल्स हावडा, 11401 मुंबई-नागपुर नंदीग्राम एक्स्प्रेसचा समावेश आहे.


कॉपी करू नका.