भुसावळात सट्ट्यावर धाड : 11 हजारांच्या रोकडसह दोघे जाळ्यात
भुसावळ : शहरातील खडका रोड, गांधी नगर भागात कल्याण मटका सुरू असल्याची माहिती सहा.पोलिस अधीक्षक अर्जित चांडक यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आरोपींच्या ताब्यातून मोबाईल व 10 हजार 815 रुपयांच्या रोकडसह सट्टा-जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई सोमवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली. दीपक सीताराम पाटील (43, खडका रोड, गांधी नगर, भुसावळ) व विनोद पांडुरंग अनफाट (40, खडका रोड, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
आरोपी दीपक पाटील हा त्याच्या घरात आरोपी विनोद अनफाटसह कल्याण मटक्याचे आकडे घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत दोघांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून कॅलक्यूलेटर, मोबाईल, डायरी, रजिस्टर व रोकड मिळून 10 हजार 815 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध जीवन कापडे याच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहा.पोलिस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, ईश्वर संजय भालेराव, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, संदेश निकम, सुमन राठोड, प्रशांत परदेशी, जीवन कापडे आदींच्या पथकाने केली.



