पुणे- हबीबगंज दरम्यान साप्ताहिक हमसफर विशेष ट्रेन धावणार


भुसावळ : प्रवाशांच्या सुविधासाठी पुणे-हबीबगंज दरम्यान साप्ताहिक हमसफर विशेष गाडी आणि मुंबई-आसनसोल साप्ताहिक विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

आसनसोल-मुंबई विशेष गाडी
डाऊन 02362 मुंबई-आसनसोल विशेष गाडी 10 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर बुधवारी मुंबईहून सकाळी 11.5 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी आसनसोल रात्री 8.30 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, भुसावळ, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 02361 आसनसोल-मुंबई विशेष गाडी 7 फेब्रुवारी पुढील आदेशापर्यंत दर रविवारी आसनसोलहुन 7.45 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी मुंबईला 8.00 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ व मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


हबीबगंज-पुणे हमसफर विशेष गाडी
डाऊन 02151 पुणे-हबीबगंज हमसफर विशेष गाडी 7 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी पुण्याहून 3.15 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी हबीबगंजला 4.45 वाजता पोहोचेल. या गाडीला मनमाड, भुसावळ थांबा देण्यात आला आहे. अप 02152 हबीबगंज-पुणे हमसफर विशेष गाडी 6 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी हबीबगंज हुन 3.50 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी पुणे येथे 6.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ, मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, आरक्षित विशेष गाडी क्रमांक 02362साठी आरक्षण सामान्य भाडे दराने आणि संपूर्ण आरक्षित हमसफर विशेष गाडी 02051 विशेष शुल्कासह 3 फेब्रुवारीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रासह संकेतस्थळावर आरक्षण उपलब्ध होणार आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !