दहिगावच्या शेतकर्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू
यावल : तालुक्यातील दहिगाव येथील प्रगतशील शेतकरी प्रेमचंद रामदास महाजन (56) हे दहिगाव शिवारातील साखरी रस्त्यावर असलेल्या स्वः- मालकीच्या शेतातील विहिरीत पाण्याची पातळी पहात असताना पाय घसरला व विहिरीत जावून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी साडेसहा वाजता ही घटना घडली. या प्रकरणी महेंद्र दिनकर महाजन यांच्या खबरीनुसार यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी, शेख असलम शेख व सहकारी करीत आहेत. मयत प्रेमचंद महाजन यांचच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परीवार आहे.


