रावेरात 35 वर्षीय इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळला
रावेर : शहरानजीक 35 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे. बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाला लागून असलेल्या गोवर्धन नगरानजीक 35 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला. मयताचा चेहरा रक्ताने माखला असून या इसमाचा घातपाती मृत्यू झाल्याचा संशय आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक प्रभारी निरीक्षक एस.टी.पाटील, सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, मनोहर जाधव यांनी धाव घेतली. पोलिस प्रशासनाकडून तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत माहिती काढली जात आहे.


