मानव सेवा हिच खरी ईश्वरसेवा : राजश्री नेवे


सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने अंध बांधवाना ब्लँकेट वाटप

भुसावळ : पुण्य मिळविण्याकरीता केवळ दान, धर्म न करता या जगात जन्मास आलेल्या प्रत्येक सुदृढ देह प्राप्त मानवाने एकदा तरी पुढाकार घेवून गोर गरीब व गरजु व्यक्तीसह दिव्यांग बांधवांना जीवनात मदत केली पाहिजे कारण मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे परखड मत सखी श्रावणी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे यांनी व्यक्त केले. सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने मंगळवार, 2 फेब्रुवारी रोजी यावल तालुक्यातील अंजाळे येथील खान्देश अंधकल्याण संघ संचलित स्नेहदिप निराधर अंध महिला आश्रमात अंध बांधवाना व महिलांना ब्लँकेट व साडी वाटप प्रसंगी नेवे बोलत होत्या.

यांची प्रमुख उपस्थिती
अध्यक्षस्थानी राजश्री नेवे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला पतंजली राज्य कार्यकारणी सदस्या महानंदा पाटील, महिला मुक्ति मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संगीता भामरे, पत्रकार उज्वला बागुल, रूही बेंडाळे, मंदाकिनी केदारे आदी उपस्थित होते . अंधबांधव संजय पाटील यांच्या गीताने कार्यक्रमास सुरवात झाली. प्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या स्तुत्य कार्याचे कौतुक करून संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. सूत्रसंचालन अंधबांधव संजय पाटील यांनी केले. कार्यक्रमास रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी देशमुख यांच्यासह माया चौधरी, भाग्यश्री नेवे, स्मिता माहुरकर, अंकिता राणे, संगीता लुल्ला यांच्यासह संस्थेच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !