सावदा नगरपालिकेतर्फे चार्जिंग पॉईंटचा शुभारंभ
सावदा : नगरपालिकेने माझी वसुंधरा या अभियानांंतर्गत पेट्रोल व डीझेलपासून होणारे प्रदूषण टाळता यावे आणि इलेक्ट्रॉनिक गाड्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून नगर पालिकेजवळ इलेक्ट्रॉनिक गाड्या चार्जिंगसाठी मोफत चार्जिंग पॉईंट उभारला आहे. या पॉईंटचा शुभारंभ नुकताच सावदा नगरीच्या विद्यमान नगराध्यक्षा अनिता येवले व नगरसेवक राजेश वानखेडे यांच्याहस्ते झाला.
यांची होती उपस्थिती
यावेळी उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, नगरसेविका मनीषा कोल्हे, रंजना भारंबे, सायरा बी.सैयद, नगपालिका कार्यालय अधीक्षक सचिन चोळकेसह नगरपालिकेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे ओरीजनल पत्रकार संघाचे अध्यक्ष युसूफ शहा, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, सचिव दीपक श्रावगे, सल्लागार भानुदास भारंबे, सदस्य कैलास परदेशी, प्रदीप कुलकर्णी, शरीफ पिंजारी, शेख फरीद, कविता सकाळकळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. चार्जिंग पॉइंटचा इलेक्ट्रॉनिक गाड्या चार्जिंग करण्यासाठी जास्तीत-जास्त वाहनधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.



