रावेर पालिकेतर्फे 161 अपंग बांधवांना सुमारे साडेतीन लाखांचा निधी वर्ग


रावेर : रावेर नगरपालिकेतर्फे शहरातील दिव्यांग बांधवांना अर्थसहाय्यच्या माध्यमातून मदत करण्यात आली. पालिकेतर्फे तब्बल तीन लाख 58 हजार पाचशे रुपये संबंधित दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती पालिकेचे मुख्यधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली. रावेर शहरातील 161 अपंग बांधवांना 2020-21 वर्षाची पालिकेने तरतूद केलेली तीन लाख 58 हजार 500 रुपयाची रक्कम रावेर शहरातील दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. ही रक्कम शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे दिव्यांग लाभार्थी यांच्या उदारनिर्वाहसाठी अपंगत्वाच्या प्रमाणानुसार प्रदान करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिली. ही प्रक्रिया एनयुएलएमचे काम पाहणारे निलेश महाजन यांनी पूर्ण केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !