वरणगावात वीज कंपनी कार्यालयाला भाजपाने ठोकले ताळे
वीज बिल दरवाढीचा निषेध : दरवाढ मागे घेण्याची मागणी
वरणगाव : वीज बिल दरवाढीचा निषेध व्यक्त करीत संतप्त भाजपा पदाधिकार्यांनी शुक्रवारी वीज कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकत घोषणाबाजी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे हाजी अल्लाउद्दीन सेट, मनोहर सराफ, शहराध्यक्ष सुनील माळी, शामराव धनगर, अॅड.ए.जी.जंजाळे, सरचिटणीस गोलू राणे, हितेश चौधरी, मिलिंद भैसे, किरण धुंदे, पप्पू ठाकरे, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष डी.के.खाटीक, अनिकेत चांदखेडकर, गजानन वंजारी, जिल्हा सरचिटणीस सादिक खान, युसूफ खान, जावेद शहा, राहुल जंजाळे, प्रशांत बावणे, कुंदन माळी, तेजस जैन यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


