रावेरात भाजपातफे महाआघाडी सरकारचा निषेध
रावेर : वीजपुरवठा खंडित करण्याचा जुल्मी निर्णय महाविकास आघाडीने त्वरीत मागे घ्यावा, कोरोना काळात जनतेला वीज बिल माफ करण्याचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूल करीत असल्याच्या निषेधार्थ भाजपाचे जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन यांच्या उपस्थितीत वीज कंपनीच्या निषेधार्थ शुक्रवारी आंदोलन करण्यात आले तसेच महावितरण कार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र लासुरकर, जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोदे, सरचिटणीस महेश चौधरी, प्रा.सी.एस.पाटील, माजी उप सभापती सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य कविता कोळी, जुम्मा तडवी, दिलीप पाटील, भास्कर बारी, नितीन पाटील आदी भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


