यावलमध्ये इंधन दरवाढीविरोधात भाजपा सरकारचा निषेध


यावल : पेट्रोल-डिझेलसह घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याच्या निषेधार्थ शिवसेने डून शुक्रवारी तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा सरकारविरोधात तीव्र निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी करण्यात आली. सातोद रस्त्यावरील तहसील कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकार्‍यांनी निवासी नायब तहसीलदार आर. के.पवार यांना निवेदन दिले.

यांची होती उपस्थिती
या प्रसंगी बाजार समितीचे सभापती तथा सेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, सेना तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, माजी तालुकाप्रमुख विजयसिंह पाटील, आदिवासी तालुकाप्रमुख हुसेन तडवी, कडू पाटील, उपतालुका प्रमुख शरद कोळी, योगेश पाटील, एल.व्ही.पाटील, आर.के.चौधरी, सुनील बारी, युवा सेना शहर प्रमुख सागर देवांग, मोहसीन खान, राजेंद्र पाटील, पंकज पाटील, हमीद दौलत पटेल, संतोष खर्चे, संतोष वाघ, शकील पटेल, सूर्यभान तायडे, चंद्रकांत चौधरी, रोहिदास महाजन, लिलाधर पाटील, योगेश पाटील, देवीदास पाटील, हारून खान, सुरतसिंग पाटील, अनिल कोळी, अझहर खाटीक, पराग महाजन, जयंत पाटील, आशिष झुरकाडे, मोहन कोळी, अनिल पाटील, महिला आघाडीच्या सपना घाडगे, चंद्रकांत चौधरी, पंकज पाटील, किरण बारी, सुधाकर धनगर व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !