मुक्ताईनगरात उद्या राष्ट्रवादीची बैठक


प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे 12 रोजी आगमन

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शनिवार, 6 रोजी दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस नवीन कार्यालयात बैठक होणार आहे. बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे 12 रोजी होणार्‍या आगमनासंदर्भात नियोजन करण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर, विनोद तराळ, ईश्वर रहाणे, बोदवड कृउबा सभापती निवृत्ती पाटील, आनंदराव देशमुख, सुधाकर पाटील, किशोर चौधरी, सुनीता चौधरी, माजी सभापती राजेंद्र माळी, विलास धायडे व दशरथ कांडेलकर आदींची उपस्थिती राहणार आहे. पदाधिकार्‍यांना उपस्थितीचे आवाहन तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, महिला तालुकाध्यक्ष लताताई सावकारे, शहराध्यक्ष ऋषिकेश पाटील आदींनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !