रावेरात शिवसेना पदाधिकार्‍यांचे धरणे आंदोलन


रावेर : पेट्रोल-डिझेलच्या व गॅसच्या किंमती त्वरीत कमी झाल्याच पाहीज, मोदी सरकार हाय हाय, आवाज कुणाचा शिवसेनेचा, शिवसेना जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देत तालुका शिवसेना, युवासेने तर्फे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना जिल्हा उप प्रमुख प्रल्हाद महाजन, तालुका प्रमुख योगीराज पाटील यांचया नेतृत्वाखाली येथील पीपल्स बँकेजवळ शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
या प्रसंगी युवासेना तालुका युवाधिकारी प्रवीण पंडीत, तालुका संघटक अशोक शिंदे, रावेर शहर प्रमुख नितीन महाजन, सावदा शहर प्रमुख सुरज परदेशी, भरत नेहते, मिलिंद पाटील, शहर युवाधिकारी राकेश घोरपडे, ज्येष्ठ शिवसैनिक छोटु पाटील, तुकाराम कोळी, कन्हैया गणवानी, माजी सरपंच अनिल पाटील, अनिल अट्रावलकर, विनायक पाटील, प्रमोद कोंडे, रवींद्र महाजन, अशोक पाटील, जयेश पाटील, प्रदीप महाजन, कृणाल बागरे, अक्षय महाजन, मयुर महाजन, निलेश वरणकर, दादु पाटील, पवन महाजन, जगन्नाथ पाटील, किरण पाटील, कैलास मनुरे युवराज पासुन, आकाश जाधव, समाधान महाजन, महेंद्र इंगळे, पवन महाजन यांच्यासह शिवसेना युवासेना व अंगअंगीकृत संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !