लेडीज रनच्या सराव प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात
भुसावळ : जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्टस अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे यावर्षीदेखील 7 मार्च रोजी शहरातील महिलांसाठी बिसारा लेडीज इक्वँलिटी रनचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या रनमध्ये सहभागी महिला स्पर्धकांना धावण्याचा सराव व्हावा या उद्देशाने गुरुवार, 4 फेब्रुवारीपासून मोफत ट्रेनिंग सेशन सुरू करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ महिला स्पर्धक डॉ. छाया चौधरी यांनी निलांबरी शिंदे यांच्यासह इतर ज्येष्ठ महिला व तरुणींच्या उपस्थितित नारळ वाढवून अधिकृत उद्घाटन केले.


आठवड्यातून तीन दिवस मार्गदर्शन
भुसावळ रनर्सतर्फे दर मंगळवार, गुरुवार व रविवार या दिवशी मोफत मार्गदर्शन करण्यात येत असून यामध्ये धावण्याआधी वॉर्म अप, तीन ते पाच किलोमीटर धावण्याचा सराव व धावल्यानंतर आवश्यक असलेली स्ट्रेचिंगचा व्यायाम प्रकार यांचा समावेश असेल. धावतांना नवीन सहभागी स्पर्धकांना अचूक मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने भुसावळ रनर्सच्या महिला धावपटू या नवोदित स्पर्धकांसोबत धावल्या त्यामुळे एखाद्या स्पर्धकाची धावण्याची पद्धत अथवा इतर काही चुकत असल्यास त्याचवेळी त्या स्पर्धकाकडून आवश्यक सुधारणा करून घेता आली, असे कृपा मुलचंदानी यांनी सांगितले. शिवाय धावण्यासोबतच घेतलेल्या स्ट्रेचिंगने सर्वांगसुंदर व्यायाम झाला अशी प्रतिक्रिया सुजाता सोनवणे यांनी दिली. आज प्रथमच खूप वर्षांनी धावले व भुसावल रनर्सच्या महिला सदस्यांनी अतिशय शास्रोक्त पध्दतीने शिकविल्याने खूप आनंदी व उत्साह वाटत आहे, असे वैशाली राणे यांनी सांगितले. वॉर्म अप व स्ट्रेचिंग सरावासाठी भुसावळ रनर्समधील योग शिक्षिका पूनम भंगाळे व पूनम कुलकर्णी यांनी प्रवीण फालक यांच्या सहकार्याने मार्गदर्शन केले तर धावण्याच्या सरावासाठी मीना नेरकर, कंगना मनवाणी, सीमा पाटील, स्वाती फालक, चारुलता अजय पाटील, सुवर्णा पाटील, सोनाली वारके, सरला पाटील, ममता ठाकूर, हर्षा लोखंडे, अनिता पाटील या महिला धावपटू नविन स्पर्धकांसोबत धावल्या. लवकर ऑनलाइन नाव नोंदणी हीींिीं://लळीं.श्रू/36ाप1ॠू या लिंकवर करावी, असे आवाहन संयोजिकाद्वय डॉ. नीलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी केले आहे.


