जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


जळगाव : शहरातील बेंडाळे चौकात बेवारसरित्या जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या 35 वर्षीय तरुणाचा सकाळी जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मयताची ओळख पटली असून विनोद महेश देवांगण (35) असे मयत तरुणाचे नाव आहे मात्र नातेवाईकांचा शोध सुरू असून शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

उपचार सुरू असताना मृत्यू
शहरातील बेंडाळे चौकांतील रिक्षाच्या थांब्याजवळ गुरूवार, 4 फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अनोळखी 35 वर्षीय तरूण बेवारसरीत्या पडून होता. त्याला काही रीक्षा चालकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अनोळखी तरूणाचा मृत्यू झाला. शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरूवातीला अनोळखी म्हणून दाखल करण्यात आले होते. यापुर्वी देखील सदरील तरूण रूग्णालयात दाखल होता. त्यानुसार मागील नोंदणी व केसपेपरची शनीपेठ पोलिसांनी चौकशी केली असता त्याचे नाव निष्पन्न झाले मात्र नातेवाईकांचा शोध घेणे सुरू आहे. ओळखीचे व्यक्ती असल्यास संबंधित व्यक्तीने शनीपेठ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन शनीपेठ पोलिसांनी केली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !