अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभागातर्फे शिवजयंतीनिमित्त भुसावळ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
भुसावळ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतूने अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळ आणि पंचायत समिती शिक्षण विभागा यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटात इच्छुक व्यक्तीसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे.
ऑनलाईन होणार स्पर्धा
सध्याचा कोरोना काळ लक्षात घेता ही स्पर्धा ही ऑनलाईन घेण्यात येत आहे. इच्छुक सहभागींनी आपला वकृत्वाचा व्हिडिओ तयार करून तो यु ट्युबला डाउनलोड करून त्याची लिंक अंतर्नाद प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या व्हाटसअप ला टाकावयाची आहे. प्राथमिक फेरी ऑनलाईन होणार आहे आणि अंतिम फेरी बक्षीस वितरणाच्या दिवशी होणार आहे.

चार गटात होणार स्पर्धा
वकृत्व स्पर्धा चार गटात होणार आहे. प्रत्येक गटातील तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शिवचरीत्र पुस्तक, प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभागी सर्व स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देउन प्रोत्साहन दिले जाणार आहे.
पहिला गट तिसरी ते पाचवीसाठी आहे. शिवराज्याभिषेक, जिजाऊंचा शिवबा, मी बाल शिवाजी बोलतोय असे विषय असतील. वेळ 3 मिनिट आहे. दुसरा गट 6 वी ते 8 वीचा आहे. शिवरायांची युद्धनीती, छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक, छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गड किल्ले असे विषय असतील. वेळ चार मिनिट आहे. स्पर्धकांचा तिसरा गट 9 वी ते 12 वीचा आहे. महिलांचा आदर करणारे शिवराय, शिवरायांचे जलव्यवस्थापन, बहुजननायक छत्रपती शिवाजी असे विषय असतील.वेळ 5 मिनिट आहे.
खुल्या गटासाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
पहिल्यांदाच खुल्या गटासाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.चौथा गट हा खुला असणार आहे. यात कुणीही भाग घेवू शकणार आहे. यात वयाची किंवा व्यवसायाची कुठलीही अट नसणार आहे. शिवरायांचे धर्मनिरपेक्ष धोरण, छत्रपती शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरु, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कृषी धोरण व आजचा शेतकरी असे विषय असतील.वेळ सात मिनिट असणार आहे. बुधवारी नियोजनाची बैठक घेण्यात आली.अंतर्नादचे आणि शिक्षण विभागाचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.
यांचा नियोजन समितीत सहभाग
नियोजन समितीत ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, योगेश इंगळे, जीवन महाजन, सुनिल वानखेडे, श्रीकांत जोशी, नाना पाटील, आनंद सपकाळे, समाधान जाधव, अमित चौधरी, प्रा.पंकज पाटील, निवृत्ती पाटील, अमितकुमार पाटील, प्रा.श्याम दुसाने, वंदना भिरुड, प्रा.भाग्यश्री भंगाळे, भूषण झोपे, रोहिदास सोनवणे, राजेंद्र जावळे, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, जीवन सपकाळे, हरीश भट, सचिन पाटील, प्रमोद पाटील, संदिप सपकाळे, मंगेश भावे हे आहेत. जास्तीत-जास्त विद्यार्थी आणि इतर इच्छुकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख संजय भटकर, प्रकल्प समन्वयक देव सरकटे, सह समन्वयक राजू वारके, गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.


