बोदवड जिल्हा परीषद उर्दू कन्या शाळेला उपशिक्षणाधिकार्यांची भेट
बोदवड : उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी बोदवड येथील जिल्हा परीषद उर्दू कन्या शाळेला प्रासंगिक भेट दिली व शाळा व विद्यार्थ्यांची माहिती जाणून घेतली. भविष्यात जि.प.बोदवडची उर्दू कन्या शाळा एक आदर्श शाळा होण्यासाठी मार्गदर्शन केले. जि.प.उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक शेख इकबाल फैयाजुद्दीन यांनी उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल. पवार म्हणाले की, जिल्हा परीषदेतील प्रत्येक शाळा उत्कृष्ट असून शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांना दररोज शाळेचे हितासाठी अपडेट अर्थात अद्ययावत केले जावे, असे मत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी बोदवड येथील जि.प.उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक शेख इकबाल फैयाजुद्दीन, शाळेचे समन्वयक सादीक अली अहमद, शिक्षक नयामत शेख, सुजाउर रेहमान, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक बोदवडचे सचिव मज़हर मुख्तार शाह आणि कोषाध्यक्ष जैनुल आबेदीन, जाविद शाह, आसिफ खान, साजिद शाह आणि शाळेतील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक शेख इकबाल फैयाजुद्दीन यांनी बोदवडचे गटशिक्षणाधिकारी बी.एन लहासे यांच्या मार्गदर्शनाचे आभार मानले.


