लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ दरम्यान त्रि-साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार
भुसावळ : रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ दरम्यान त्रि साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
आठवड्यातून तीन दिवस धावणार गाडी
2107 त्री साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 6 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी 4.25 वाजता सुटल्यानंतर लखनऊ येथे दुसर्या दिवशी 3.10 वाजता पोहोचेल.
02108 त्री-साप्ताहिक विशेष लखनऊ येथून 7 फेब्रुवारी ते 1 एप्रिलदरम्यान दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी 10.45 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्या दिवशी 11 वाजता पोहोचेल.
केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.


