संवाद यात्रा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार
मुक्ताईनगरात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे तर रावेरात माजी आमदार अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक
रावेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दौर्यानिमित्त मुक्ताईनगरासह रावेर येथे महत्वाची बैठक पार पडली. यावेळी जास्तीत-जास्त संखेने मुक्ताईनगर व फैजपूर येथील संवाद यात्रेत सहभागी होण्याचे अवाहन माजी आमदार अरुण पाटील यांनी केले तर मुक्ताईनगरातील बैठकीत संवाद यात्रा यशस्वी करण्याचा निर्धार माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला.
रावेर कृउबात बैठक
रावेर : कृषी उपन्न बाजार समितीत बैठक झाली. यात आगामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संवाद यात्रा 11 रोजी रावेर तालुक्यात येत असल्याने त्या संदर्भात नियोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष गोटू शेट, किसान सभेचे सोपान पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील, पंचायत समिती दीपक पाटील, योगेश पाटील, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, शहराध्यक्ष महेमूद शेख, युवक अध्यक्ष प्रणीत महाजन, पांडुरंग पाटील, पिंटू दाणी, गोपाळ पाटील यांच्यासह मोठ्या संखेने राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपाचे जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशध्याक्ष जिल्ह्यात येण्यापूर्वीच राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू झाले आहे. जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे यांनी भाजपा सोडुन रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी आमदार अरुण पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. तायडे भाजपाकडून एक टर्म पंचायत समिती सदस्य तर तीन टर्म जिल्हा परीषद सदस्य होते. भाजपाकडून ते अडीच वर्ष जिल्हा परीषदेचे अध्यक्षदेखील होते.
12 रोजी प्रदेशाध्यक्षांची मुक्ताईनगरात जाहीर सभा
मुक्ताईनगर : राष्ट्रवादी परीवार संवाद यात्रेच्या निमित्ताने 12 फेब्रुवारी रोजी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील येत असून यावेळी ते मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या पक्ष संघटनेचा आढावा घेऊन कार्यकर्त्यां समवेत संवाद साधतील. यावेळी जाहिर सभा होणार असून शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या दौर्याच्या नियोजनासंदर्भात शनिवारी पक्षाची बैठक माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या साहेब पाटील, जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष लता सावकारे, युवक तालुका अध्यक्ष शाहीद खान, माजी सभापती राजु माळी, दशरथ कांडेलकर, विलास धायडे, रामभाऊ पाटील आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

