भुसावळात वैतागवाडीत छापा : 5 आंबटशौकीन ग्राहक जाळ्यात
भुसावळ : शहरातील वैतागवाडी परिसरात पोलिसांनी रविवारी सायंकाळी अचानक छापा टाकून पाच आंबट शौकीनांसह 6 महिलांना ताब्यात घेतले. यामुळे वैतागवाडी परिसरात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ पोलिस ठाण्यात पीटा अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रविवारी दुपारी एका महिलेचे मंगळसूत्र धूम स्टाइल चोरट्यांनी लांबविले तर जामनेर रोडवर शनिवारी दुपारी एका व्यक्तीस भर दुपारी लुटल्याची घटना घडली लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील कर्मचारी, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी, तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी अचानक वैतागवाडीत छापा टाकला, यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. वैतागवाडी परिसरात पोलीस आल्याने तेथे एकच धावपळ उडाली याच दरम्यान पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.
पाच महिला ताब्यात
पोलिसांनी वैतागवाडी परिसरात केलेल्या कारवाईत सहा आंबट शौकीनांसह पाच महिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पीटाअँक्ट नुसार कारवाई
वैतागवाडी परिसरात केलेल्या कारवाई प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करायची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालणारा त्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
