ट्रॉलीच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू


रावेर : ट्रॉली नसलेले ट्रॅक्टरचे धूड अविचाराने चालवत स्वतःच्याच घराला त्याची धडक लागल्याने ट्रॅक्टर चालकाच्या आईचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री रावेर शहरात घडली. गोरेलाल रंधवे (भिलाला, 39 , व्यवसाय मजुरी, रा.स्वास्तिक टाकीजच्या मागे, बर्‍हाणपुर रोड , रावेर) यांनी रावेर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संजय महेताब रंधवे (भिलाला ) हा सोमवारी रात्री ट्रॅक्टर चालवत होता रात्री 9 .30 वाजेच्या सुमारास सोनु पाटीलनगरमधील आरोपीच्या घराजवळ आल्यावर आपल्याच घराचे छताला धडक दिल्याने घराचे छतावरील पत्रे व दगडे खाली पडले त्याखाली रुमलीबाई महेताब रंधवे व महेताब गुलाबसिंग रंधवे दबले गेले त्यात रुमलीबाई जागीच मयत झाली घराच्या नुकसानीस व महेताब यांच्या दुखापतीस व रुमलीबाई हिचे मरणास कारणीभुत झाला म्हणुन चालकाविरोधात रावेर पोलीस ठाण्यात भादवि कलम 304 , 27 9 , 337 , 338 427 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे.गुन्हा.दाखल करण्यात आला आहे पोनि रामदास वाकोडे , सपोनि शितलकुमार नाईक , पोउनि मनोहर जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला . पुढील तपास निलेश चौधरी हे करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !