रावेर पंचायत समिती सभापती-उपसभापतींची बिनविरोध निवड


रावेर : रावेर पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या कविता हरलाल कोळी तर उपसभापती धनश्री संदीप सावळे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीसाठी पंचायत समिती सभागृहात तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी उषाराणी देवगुणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि गटविकास अधिकारी दीाली कोतवाल यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सदस्यांची बैठक झाली.

एकमेव अर्जामुळे बिनविरोध निवड
सभापती पदासाठी कविता हरलाल कोळी तर उपसभापती पदासाठी धनश्री संदीप सावळे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज आले त्यामुळे सभापतीपदी कविता कोळी तर उपसभापतीपदी धनश्री सावळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी उषाराणी देवगुणे यांनी केली. बैठकीस माधुरी नेमाडे, अनिता चौधरी, प्रतिभा बोराले, रुपाली कोळी ,योगिता वानखेडे, योगेश पाटील, जुम्मा तडवी, जितेंद्र पाटील, दीपक पाटील, पी.के.महाजन उपस्थित होते.

नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार
भाजप कार्यालयात सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यात नवनिर्वाचित सभापती कविता कोळी उपसभापती धनश्री सावळे यांचा सत्कार आमदार सुरेश भोळे, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, कृऊबा सभापती श्रीकांत महाजन तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस सी.एस.पाटील, लक्ष्मण सावळे, सुनील पाटील, महेश पाटील यांनी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !