किनगाव अपघात : ट्रकचालकासह पपई व्यापार्‍याची कोठडीत रवानगी


यावल : पपई वाहून नेणारा ट्रक उलटून 15 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आयशर चालक आणि पपई व्यापार्‍याला यावल न्यायालयाने 18 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन, तसेच क्षमतेपेक्षा जास्त मजुरांची वाहतूक केल्याने चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 14 रोजी मध्यरात्री किनगावजवळ आयशर कलंडल्याने 15 जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाहनचालक शेख जहीर शेख बद्रुद्दीन (रा. मोमीनपुरा, रावेर) आणि पपई व्यापारी आमीन शाह रज्जाक शाह (रा.केर्‍हाळा, ता. रावेर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दोघांना मंगळवारी यावल न्यायालयाचे न्या.एम.एस.बनचरे यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस उपनिरीक्षक अजमल खान पठाण, हवालदार संजय तायडे तपास करत आहेत. जखमी मजुरांचा जाबजबाब नोंदवून, वाहन चालकाची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !