युवतीची गळफास घेवून आत्महत्या
वरणगाव : येथील आयुध निर्माणी वसाहत शेजारी दर्यापूर शिवारातील अन्नपुर्णा नगरातील रहिवासी सीमरण भरत बोदडे (21) या तरुणीने राहत्या घरात गळफास लावून सोमवारी आत्महत्या कली. याबाबत निवृत्त जवान रतन पवनकुमार बोदडे (45, रा. बेटावद, ता.जामनेर) यांच्या खबरीनुसार वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

