मुक्ताईनगरातील अतिक्रमित घरे नियमित करण्यासाठी आमदार पाटील यांना साकडे


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहर व ग्रामीण भागातील 2011 पूर्वीचे रहिवासी असलेले अतिक्रमित घरे नियमाकुल करण्यासाठी त्यांच्या जागेची मोजणीचा खर्च हा जिल्हा नियोजन समितीमार्फत केला जाईल, अशी सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकारी वर्गाच्या आढावा बैठकीत केली होती. त्यामुळे अतिक्रमणधारकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आमदारांच्या आभार आणि नागरी सत्कार करण्यासाठी गावचे पोलीस पाटील मोहन मेढे, जगदेव इंगळे, हापीस खान मिया खान, मीराबाई न्हावी, उमाबाई गोसावी यांच्या शिष्टमंडळाने आमदार पाटील यांचे निवासस्थानी जाऊन संबोधी नगरातील रहिवाशांच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

आमदार म्हणाले, घरे नियमाकुल करणार
मुक्ताईनगर येथील जुना बर्‍हाणपूर रोडला लागून संबोधी नगरात गेल्या 30 वर्षापासून बहुजन समाजातील व मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक लोक घरे बांधून त्यांच्या कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र शासनाच्या 2011 च्या जीआरनुसार शहरी व ग्रामीण भागातील अतिक्रमीत असलेली घरे ही नियमाकुल करण्यात येईल, असे धोरण आहे परंतु दोन तीन वेळा तहसील कचेरीत नागरीकांनी प्रस्ताव दाखल करूनदेखील ते जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले नाही. यासंदर्भात दिलेल्या प्रकरणाची नावांची यादीचे निवेदन आमदार चंद्रकांत पाटील यांना नागरीकांनी देऊन साकडे घातले. आमदारांनी घरे नियमाकुल करण्याविषयी आढावा बैठकीत तहसीलदार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, बीडीओ आदींना योग्य त्या सूचना केल्या आहेत व आता ही कामे वेगाने हालचाली करून लवकरात-लवकर घरे नियमाकुल करून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असेही ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
यावेळी अशोक भोई, सलीम शहा, रवींद्र तायडे, गणेश बोदडे, सुनील तायडे, बाळू मेढे, संतोष महिरे, बाबू शहा फकीर, शेख इक्बाल, शेख कासम, शेख हमीद, विमल अंभोरे, सुशीलाबाई इंगळे, अरुण वानखेडे, जमुनाबाई गोसावी, रुकसाना बी.फकीर, हमीदा बी.हसन, प्रमिला तायडे, जयाबाई सावळे, सुनीता गोसावी आदींची उपस्थिती होती. आभार पोलीस पाटील मोहन मेढे यांनी केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !