विवरेनजीक रीक्षा उलटल्याने महिलेचा मृत्यू


रावेर : बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर अपघाताचे सत्र कायम असून गुरुवारीदेखील रीक्षा उलटल्याने विवरा येथील प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. सगीराबी शेख सकुर (49, रा.विवरा) असे मयत महिलेचे नाव असून या अपघातात अन्य काही प्रवासीदेखील जखमी झाल्याचे सांगण्यात आले. 15 रोजी पपईने भरलेले आशयर पलटी होऊन 15 जणांचा मृत्यु झाला व त्यानंतर पुन्हा 16 रोजी महामार्गाला लागून असलेल्या अजंदेनजीक खड्डा चुकवतांना एकाचा मृत्यू झाला होता.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !