अरे देवा ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 152 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 58 हजार 173 वर : एकाच दिवसात 39 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तब्बल 152 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1369 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार 173 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 56 हजार 24 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर शुक्रवारी एकाच दिवसात 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

शुक्रवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 79
जळगाव ग्रामीण 01
भुसावळ 14
अमळनेर 07
चोपडा 00
पाचोरा 04
भडगाव 00
धरणगाव 01
यावल 01
एरंडोल 03
जामनेर 05
रावेर 01
पारोळा 05
चाळीसगाव 22
मुक्ताईनगर 02
बोदवड 03
अन्य जिल्हा 04



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !