भुसावळात 22 हजारांचा विमल गुटखा जप्त
भुसावळ : राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची बद्री प्लॉट भागातील दुकानावर विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकत 22 हजार 315 रुपये किंमतीचा गुटखा शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जप्त केला. विनोद भारंबे यांच्या दुकानात ही कारवाई करण्यात आली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सहायक अधिक्षक अर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक मंगेश गोटला, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, प्रशांत सोनार, ईश्वर भालेराव आदींनी ही कारवाई केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आली. संशयीत आरोपी भारंबे यास अटक करण्यात आली. सहा.पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला पुढील तपास करीत आहे.

