यावल पालिकेतर्फे दिव्यांग बांधवांच्या खात्यात निधी वर्ग
यावल : राज्य शासन परीपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधीही दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करण्याचे आदेश असल्याने एकूण 241 दिव्यांग बांधवांच्या खात्यात चार लाख 53 हजार 500 रुपयांचा निधी मुख्याधिकारी बबन तडवी यांनी वर्ग केला. नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी, उपनगराध्यक्षा रुखमाबाई भालेराव (महाजन) यांनी निधीचे वितरण केल्याने शहरातील दिव्यांग बांधवांमध्ये व त्यांच्या कुटुंबामध्ये समाधान व्यक्त होत आहे. दिव्यांग निधी मिळण्यासाठी नगरपरीषदेचे गट नेते तथा माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील, नगरसेवक माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते यांनी शासनाच्या माध्यमातुन सतत पाठपुरावा केल्याने यावल शहरातील दिव्यांग लाभार्थी बांधवानी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व लोकप्रतिनीधी मान्यवरांचे आभार मानले. सामान्य प्रशासन अधिकारी विजय बडे, लेखापाल शरद पाटील, लेखा परीक्षक नितीन सुतार व दिव्यांग कर्मचारी मोहन सोनार यांनी सहकार्य केले.

