चाकूच्या धाकावर लूट : तस्लीम काल्यासह दोघांना 22 पर्यंत पोलिस कोठडी
भुसावळ : शहरातील दिनदयाल नगराजवळ शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बळीराम किसन बाणाईत (मोरझिरा, ता.मुक्ताईनगर) यांच्या खिशातील 15 हजारांची रक्कम चाकूचा धाक दाखवत तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम शेख (रा. दिनदयाल नगर, भुसावळ), फिरोज शहा हसन शहा, गिरीष गोकुळसिंग जोहरी, सैय्यद अरमान सैय्यद अमान (रा. मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांनी लुटून पोबारा केला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तस्लीम काल्यासह फिरोज शहा हसन शहा यांना रविवारी अटक करण्यात आली होती तर ओळख परेडसाठी पोलिस कोठडीचा हक्क राखून पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मागितली होती. ओळख परेड झाल्यानंतर आरोपींना शुक्रवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता आरोपींना 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहा.पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील करीत आहेत.

