वीज कंपनी सहा.अभियंत्यांना मारहाण करणारा संशयीत पसार
भुसावळ : शहरात वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहा.अभियंता तुषार हिंगणे यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गांधी नगरात घडली होती. या प्रकरणी याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तुषार सुरे (फालक नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजारपेठ पोलिसांनी रात्री संशयीताचा घरी शोध घेतला असता घर बंद आढळले होते. संशयीताला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सहा.अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले.

