फैजपूरच्या विकासासाठी भरघोस निधी देणार : आमदार शिरीष चौधरी


फैजपूर : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फैजपूर शहराच्या विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी मिळवून देऊ, असे आश्वासन रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी दिले. फैजपूर पालिकेंतर्गत तहानगर व विद्यानगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून या दोन रस्त्यांचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले.

निधीसाठी सरकारकडे पाठपुरावा करणार
आमदार चौधरी म्हणाले की, फैजपूर शहराचे वेगळे स्थान आहे. याठिकाणी 1936 मध्ये काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन भरले त्यामुळे भारताची स्वातंत्र्याची चळवळ फैजपूर येथे ग्रामीण भागात येऊन पोहचली आणि हे अधिवेशन कायम स्मरणात राहावे व आपल्या गावाचा वारसा निर्माण व्हावा म्हणून पालिकेच्या सर्व पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी एकत्रित येऊन 1936 च्या ग्रामीण अधिवेशनाच्या प्रतिकृतीचे कोरीव संकल्प चित्र उभारले असे गौरवउदगार काढुन फैजपूर शहराने मला भरभरून आशिर्वाद दिले याचे ऋण व्यक्त केले. रावेर विधानसभा मतदारसंघातील फैजपूर, यावल व रावेर तिन्ही नगरपालिकांना शासनाचा निधी मिळणे गरजेचे आहे म्हणून या तिन्ही पालिकांच्या विकास कामांसाठी चांगल्या दर्जाचा निधी मिळविण्यासाठी आघाडी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून. या तिन्ही नगरपालिकांना शासनाचा भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी यावेळी दिले. यानंतर भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे यांनी फैजपूर शहराच्या हद्दवाढ भागांच्या विकास कामांसाठी भरगोस निधी मिळावा व फैजपूर शहरासाठी ग्रामीण रुग्णालयाला तत्वतः मंजुरी मिळाली आहे. अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे प्रयत्न करण्याची आ.चौधरी यांच्या कडे मागणी वजा अपेक्षा व्यक्त केली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष नयना चंद्रशेखर चौधरी, भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, जिल्हा दूध संघ संचालक तथा ज्येष्ठ नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगरसेवक केतन किरंगे, नगरसेवक रशीद तडवी, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, नगरसेवक अमोल निंबाळे, माजी नगरसेवक महेबूब पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, शेख इरफान शेख इकबाल, मलक आबीद, ठेकेदार संजय वाणी, दीपक होले, हाडवैध रघुनाथ कुंभार, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रीयाज, काँग्रेस शहर उपाध्यक्ष शेख आसिफ मॅकनिकल, युवक काँग्रेस रावेर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष शेख वसीम जनाब, सरचिटणीस मुदस्सर नजर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वसीम तडवी, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष शेख शाकिर, पालिका बांधकाम विभागाचे वरीष्ठ लिपिक दिलीप वाघमारे, लिपिक शिवा नेहेते, बाविस्कर आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !