17 हजारांची दारू जप्त : दोघा आरोपींना अटक
बोदवड : विना परवाना देशी-विदेशी दारूची वाहतूक करणार्या दोघा आरोपींना बोदवड पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून 17 हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी कॉन्स्टेबल संदीप शांताराम वानखेडे (32) यांच्या फिर्यादीनुसार सुनील मनोहर महाले (39) व विजय प्रकाश तायडे (32, दोन्ही रा.लिहा, ता.मोताळा, जि.बुलढाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी दुपारी चार वाजता ठोंबरे डेअरीजवळ ही कारवाई करण्यात आली. तपास नाईक गजानन काळे करीत आहेत.

