सावद्यात विनामास्क फिरणार्‍या 104 नागरीकांवर दंडात्मक कारवाई


सावदा : कोरोना रुग्णांची वाढती संख्येनंतर जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसासर रविवारी सकाळी 9.30 ते दुपारी एक दरम्यान सावदा नगरपरीषद तसेच पोलिस प्रशासनाने विनामास्क फिरणार्‍या 104 लोकांवर दंडात्मक कारवाई करीत 22 हजारांचा दंड वसुल केला. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर तसेच आठवडे बाजार परीसरात मास्क परीधान न केलेल्या एकूण 104 नागरीकांवर दंडात्मक कारवाई केली. मुख्याधिकारी सौरभ जोशी तसेच सावदा सहा.निरीक्षक देविदास इंगोले यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली तसेच कारवाई नियमित सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी नगरपालिका कार्यालय निरीक्षक सचिन चोळके, आहुजा, कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !