भुसावळात शिवजयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरीकांतर्फे वृक्षारोपण
भुसावळ : शहरातील दत्तनगरातील श्री त्रिमुखी दत्त मंदिराचे अध्यक्ष व निसर्ग पर्यावरण प्रदूषण मंडळाचे राज्य सल्लागार वैद्य रघुनाथ आप्पा सोनवणे, निसर्ग मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना शंकर पाटील, डॉ.डी.एस.पाटील, राज्य तथा जिल्हा मार्गदर्शक सुरेंद्रसिंग पाटील आदींच्या उपस्थितीत श्री त्रिमुखी दत्त मंदिराच्या परीसरात शिव जयंतीच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.
विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड
मंदिराच्या सभोवती निंब, वड, पिंपळ, कांचन, उंबर अशा विविध वृक्षांचे वृक्षारोपण शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात आले. यावेळी निसर्ग समितीचे राज्य सल्लागार यांनी कोरोनाची परीस्थितीचा विचार करून शिवजयंतीच्या निमित्ताने पर्यावरण पूरक झाडे लावण्याचा उपक्रम आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून राबविला यासाठी निसर्ग पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना शंकर पाटील यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरीक डॉ.डी.एस.पाटील, जिल्हाध्यक्ष नाना पाटील, अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे, सुरेंद्रसिंग पाटील, रमेश साखळकर, वसंत बोरनारे, राणे, मधु ढाके, काशीनाथ पाटील, चौधरी, सिंगतकर, बर्हाटे, वाणी, ह.भ.प.पांगडे, व इतर महिला भगिनी, श्री त्रिमुखी दत्त मंदीराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

