किनगावच्या विवाहितेचा छळ : पतीसह सासू, सासर्यांविरुद्ध गुन्हा
यावल : तालुक्यातील किनगाव येथील माहेर असलेल्या 28 वर्षीय विवाहितेचा, पैशांसाठी छळ केल्याप्रकरणी सासरच्या तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला. रीना विजय सोनवणे या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह नोव्हेंबर 2009 मध्ये मंगरुळ (ता.पारोळा) येथील विजय रामकृष्ण सोनवणे यांच्याशी जळगावात झाला होता. लग्नानंतर जळगावातील आनंद कॉलनीत राहत होते. विवाहितेला गेल्या 9 महिन्यांपासून माहेरून 4 लाख रुपये आणावे म्हणून सासरी छळले जात होते. तसेच तिला माहेरी किनगावला पाठवण्यात आले होते. त्यामुळे पती विजय रामकृष्ण सोनवणे, सासू चमेलीबाई रामकृष्ण सोनवणे व सासरे रामकृष्ण सोनू सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

